वरचे अनेक प्रतिसाद संमिश्ररित्या पटले. विरभींनी सांगितलेला अनुभव मला पण आलाय. मराठी माणूस स्वतःच्याच डबक्याच्या बाहेर यायला तयार नसतो. इतरांशी मिळून मिसळून घेणे हे जमत नाही. खरे आहे. तसेच माझा अजून एक अनुभव आहे की मुंबईत येणारे भैय्ये लोक हे कष्टाला मागेपुढे बघत नाहीत पण आपलीच मराठी मुलं त्यावेळेला नाक्यावर बसून चकाट्या पिटत असतात.
पण याच वेळेला मराठी बोलणारा माणूस म्हणजे खालचा, मराठी लोक म्हणजे कमी दर्जाचे, मराठी वातावरण-व्यक्तींना मराठी म्हणून नकार हे सगळं मी जेव्हा माझ्या क्षेत्रात पहाते तेव्हा 'एवढा त्रास वाटतो तर आमच्या राज्यात आलातच कशाला?' अशी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटते. जिथे तुमचं पोट भरलं जातंय तिथल्याच लोकांना कमी लेखून, त्यांची संस्कृती नाकारून तुम्ही रहाणार असाल तर तुम्ही परप्रांतियच आणि 'यू आर नॉट वेलकम'... मराठी भाषा, मराठी माणसे, मराठी संस्कृती यांना नकार देऊन किंवा कदाचित 'प्लेग' सारखे टाळून तुम्ही इथे टिकायला वघत असाल तर साहजिकच मराठी समाजाकडून तुमच्या विरूद्ध प्रतिक्रिया येणारच.
चांगलं जगणं, पोट भरणं हे हवं आणि हे जिथे होतं तिथल्यांना तुमचा नकार. हे नाही पटत. आज कलकत्त्यात गेलो आणि हिंदीमधे पत्ता विचारला तर हिंदी येत असूनही नाही सांगणारे लोक भेटतात. त्या टोकाला नाही जायचे आपल्याला पण इथे रहाताय तर इथले बना अश्या आग्रहात काय चूक आहे?
पेशव्यांच्या काळापासून किंवा मराठा राज्य झाल्यापासून व्यापारी माणूस हा गुजराथी किंवा मारवाडी असायचा. आणि ते सगळे इथल्या संस्कृतीमधे मिसळून गेले त्यांची स्वतःची संस्कृती न विसरता. ते इथले झाले. मग हेच फाळणीच्या वेळेस आलेल्या काही पंजाब्यांनीही केलं, सिंध्यांनी केलं काही प्रमाणात मग हे सगळं या भैय्यांना, आता येणाऱ्या पंजाब्यांना, बंगाल्यांना करायला काय जातंय? नकार का?