आता माझंही थोडंसं:
जम्मू-कश्मीरमध्ये राज्याबाहेरच्या व्यक्तींस मालमत्ता करण्यास मनाई आहे. एकीकडे त्याविरुद्ध बोंब मारायची, जम्मू-कश्मीरवाल्यांना भारताशी एकात्म व्हायचं नाही आहे, एक भारत देश असताना ते असं करू शकतातच कसे, सर्व भारतीयांना जम्मू-कश्मीरमध्ये राहायचा अधिकार असायला हवा, कश्मीरी चोर आहेत, त्यांना भारतात राहून भारताबाहेर राहायचंय, they want the best of both worlds म्हणून त्यांच्याविरुद्ध खडे फोडायचे, आणि दुसरीकडे मुंबईत, महाराष्ट्रात उत्तरप्रदेशी, बिहारी, दाक्षिणात्य येतात म्हणून त्याच तोंडानं शंख करायचा. हा कुठला न्याय होतो, कळत नाही.
दुसऱ्या एका चर्चेत हिंदी चित्रपटात मोलकरणीची, पोलिसांची किंवा तत्सम पात्रं मराठीच का दाखवतात, म्हणून तक्रार होती. आता मला एक सांगा, जर ही पात्रंसुद्धा (उदाहरणादाखल) बांग्लादेशी, उत्तरप्रदेशी किंवा इतर दाखवली असती, तर तुमच्या "स्थानिक लोकाधिकार समिती"वाल्यांनी त्याविरुद्ध बोंबाबोंब, मुंबईत दंगली, जाळपोळी वगैरे केल्या नसत्या?