डबक्याच्या बाहेर याचा स्थलांतर इतकाच मर्यादित अर्थ मला अपेक्षित नाही. कळप या अर्थी म्हणायचे आहे. आणि ह्याचे उदाहरण अमेरिकेतील मराठी लोकांच्यात मी भरपूर पाह्यले आहे. डबके सुधारायचे तर बाहेर पडल्याशिवाय/ बघितल्याशिवाय सुधारता येणे शक्य नाही. आणि आपण डबक्यात आहोत हे कळण्यासाठीही डबक्याच्या बाहेर पडणे गरजेचे आहेच. डबक्यालाच जग मानले तर कसली सुधारणा नी कसलं काय. आपणच आपल्याला शिव्या...??? शब्द तुमचा आहे माझा नाही मी कुठलीही सुधारणा स्वतःपासून करावी या मताची आहे आणि त्यासाठी स्वतःचे दोष माहित असणं गरजेचे आहे. मला जे मराठी समाजाचे दोष वाटतात ते बोलून दाखवणं याला शिव्या म्हणायच्या असतील तर मग सुधारणेचा विषय विसरूनच जाऊया.