>>फक्त कमवण्यासाठी यायचे बस. ह्यांना महाराष्ट्राशी देणे घेणे नसते. फक्त कमवायचे. <<

बरोबर.. आलेला परप्रांतीय पैसा कमावण्याचे मशिन/जागा याच्यापलिकडे महाराष्ट्राकडे बघतो का? कुठलीही आदराची भावना महाराष्ट्र व मराठी संस्कृती यांच्याबद्दल का नसते यांच्या मनात? शब्दाबद्दल माफ करा पण मुंबईला अन्नदात्री/ कर्मभूमी नाही समजत हे लोक, धंदेवाली समजतात(अपवाद असणारच पण बहुसंख्येने..) आणि त्यामुळेच कसंही वागलं तरी चालतं हेही समजतात. जे मुंबईबद्दल तेच हळूहळू सगळ्या महाराष्ट्रभर होतंय. का नाही येणार राग यांचा?

पण तरी यावर उपाय त्यांना यायला नुसता विरोध करणे हा नसून आपली ताकद आणि कर्तुत्व वाढवणे हा आहे. आपला आळशीपणा आणि चौकटीच्या बाहेर न जाऊ शकणं हे संपवायला हवं. आडकाठी त्यामुळेच होईल. पण आडकाठी व्हावीच का? कशासाठी? हा प्रश्न असेल तर मग मराठी आहेस खा कानाखाली, मराठी आहेस मग तुला कोण कॉलेजमधे घेणार, मराठी आहेस ना मग नो नोकरी, मराठी आहेस तर कर जास्त, मराठी आहेस तर सगळ्या वस्तूंच्या किमती जास्त, मराठी बोलतोस लाज नाही वाटत अश्या सगळ्या गोष्टींना तयार रहा दुसरं काय..