तुम्ही दिलेल्या प्रमाणानुसार पेढे केले. मस्तच झालेत!!! अगदी बाजारातल्या पेढ्यांसारखे!!! माझ्या नवऱ्याला पेढे फार आवडतात म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न केला. आणि म्हणूनच तुम्हाला सारखे प्रश्न विचारून त्रास दिला क्षमस्व!!!
वाटी चे माप विचारण्या मागचे कारण म्हणजे, तुम्ही जर माझ्याप्रमाणे ओगलेबाईंचे पुस्तक वापरून पदार्थ बनवत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा पदार्थाचे माप वाटीच्या स्वरूपात असते. म्हणजे एक वाटी रव्याला २ वाट्या पाणी वगैरे . ज्यामुळे कोणत्याही आकाराची वाटी घेतली तरी पदार्थ भिघडत नाही.
या पाककृती साठी मी वापरलेले प्रमाण आणि माझ्या अंदाजानुसार वाटी चे प्रमाण देत आहे काही सुधारणा असेल तर सांगावे.
या प्रमाणा नुसार एक वाटी क. मिल्कला एक वाटी दुधाची पावडर वापरावी आणि अंदाजे १-२ चमचे बटर वापरावे. थोडक्यात क. मिल्क आणि दुधाची पावडर सम प्रमाणात वापरावी. अर्थात हे प्रमाण मी अंदाजे देत आहे. सर्वात उत्तम म्हणजे तुम्ही दिलेले प्रमाण वापरले तर जास्त चांगले.
पुन्हा एकदा या पाककृती साठी धन्यवाद:)
---कांचन.