नेमके आजच एक ईपत्र मिळाले की बंगलोरात कानडी बोलायला कन्नडिगांना लाज वाटते का? आपल्या भाषेचा अभिमान बाळगा. हिंदी, तमिळ वगैर बोलायचे सोडून द्या. इंग्रजी बोलताना हेल काढायचेच असतील (!) तर कानडी पद्धतीने काढा, तमिळ किंवा तेलुगू नको. बाकी भारतातले लोक पहा कसे आपापल्या भाषा टिकवून आहेत. (आणि यात मराठीचेही नाव आहे!) वगैरे वगैरे. शिवाय बाहेरचे लोक आपल्या इकडे येतात, आपल्या शहरात गर्दी करतात वगैरे मुद्देही होतेच.