माझ्या एका संशोधक मैत्रिणीने सांगितल्यानुसार केंब्रिजमधल्या महाविद्यालयांत शिकवण्यासाठी किमान क्ष इतके (किती ते विसरले) पेपर ( याला काय म्हणावे? ) प्रसिद्ध केलेले असावे लागतात. महाविद्यालयाची निवडसमिती परीक्षा घेते, मुलाखत घेते आणि मग निवडते.
मला वाटते, अभियांत्रिकी / शास्त्र महाविद्यालयात शिकवण्यासाठी शोधप्रबंधाची किंवा किमान बाह्य अनुभवाची अट असावी. तात्पुरती भरती मुळीच करू नये. विद्यार्थ्यांचे नुकसान तर होतेच. शिवाय संशोधन केलेल्या लोकांना योग्य तो मान, पगार मिळत नाही.