कांचन पेढे चांगले झाल्याचे वाचून बरे वाटले.
वाटी चे माप विचारण्या मागचे कारण म्हणजे, तुम्ही जर माझ्याप्रमाणे ओगलेबाईंचे पुस्तक वापरून पदार्थ बनवत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा पदार्थाचे माप वाटीच्या स्वरूपात असते.
हो हे खरेच असले तरी मला एका क. मिल्कच्या डब्यात किती क. मिल्क आहे हे माहिती नव्हते, आणि न पाहता उगीचच अंदाजपंचे देणे मनाला पटत नाही.
रोहिणी तुम्हाला शुगरफ़्री क. मिल्क म्हणायचे आहे का, कारण मी ते कधी वापरले नाही, यामध्य त्याचा उपयोग होईल का याची शंका आहे, कारण यात वेगळी साखर घातलेली नाही, क. मिल्कच्याच साखरेचा गोडपणा पेढ्यात आहे.
सखी.