त्या दांपत्याने त्या अतिथीला (अत्यंत नम्रपणे) असे का नाही विचारले की आपण भाकरी पोळी भात असले का नाही खात? हवेतर कोंबडी, बकरी, फार काय हवे तर गोठ्यातील गाय नाही तर वासरु कापतो आणि झणझणीत रस्सा करुन वाढतो. पण आमच्या मुलाच्या मांसाची मागणी का करत आहात? एकतर माणसाचे मांस खाणे पाप आहे तशात बालकाचे मांस खाणे तर महापाप. हे आपण का करत आहात?
ह्या तथाकथित शिवाच्या अघोरी कसोटीत उत्तीर्ण होणे म्हणजे बालकाच्या संगोपनाच्या, रक्षणाच्या मूलभूत परीक्षेत सपशेल अनुत्तीर्ण होणे नाही का?
कुठल्यातरी देवाच्या भक्तीपेक्षा पोटच्या मुलाचे संरक्षण हे जास्त महत्वाचे नाही का? कुण्या उपटसुंभ अतिथीला खूष करायला मारून, शिजवून वाढण्याइतका पोटचा पोर स्वस्त असतो का?
असल्या आचरट कथा कचर्यात फेकल्या पाहिजेत. असली अतिरेकी भक्ती ही विकृतीच आहे. ह्यातून कुठलाही बोध घेण्याची ह्या कथेची लायकी नाही.