एक यादी करायची का ?
मिलिन्दसाहेब, अगदी मुद्द्याचं बोललात! मला पटतंय.
मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर भारतात राहून बघावे. म्हणजे बऱ्याच गैरसमजांचं निराकरण होईल. भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. अगदी चेन्नै मध्ये सुद्धा. तिथेही 'शुद्ध तमिळ कोणी बोलत नाही हो' म्हणून ओरड सुरू असते.
हिंदीप्रमाणेच भारतातल्या सगळ्या भाषा राष्ट्रभाषा आहेत असे मागे एकदा मनोगतावरच वाचले होते. लोकांनी दुवे वगैरे दिले होते. थोडा शोध घेतल्यास सापडतील. महाराष्ट्रात इतर भागातून लोक येणे आणि अमेरिकेत जगाच्या इतर भागातून लोक येणे सारखेच आहे. तो ग्लोबलायझेशनचा भाग आहे. परवाच्या लोकसत्तेत नोकऱ्यांच्या ग्लोबलायझेशनवर एक लेख वाचला. त्यात लिहिल्याप्रमाणे कामाच्या शोधात जगभरातले लोक इतस्ततः जाणारच. त्यांना अटकाव अशक्य. त्यापेक्षा या संधीचा वापर करून आपली संस्कृती वाढवता कशी येईल हे पहावे.