सर्किटजी,

एखाद्या प्रश्नाची टर उडवण्यापलिकडे काही करता आले तर पहावे.

तुम्हाला विचार पटत नसतील तर पटत नाहीत म्हणून तरी लिहा. म्हणून प्रश्नाला फाटे फोडून काय मिळणार आहे?

आणि यादीच हवी असेल तर ती ही मी केलेली आहे. मनोगतावरच "महाराष्ट्राच्या समस्या" ह्या मध्ये माझे विचार मांडले आहेत.

भले हा अगदी जीवन-मरणाचा (संकट ह्या व्याख्येत बसणारा) प्रश्न नसेलही.

आणि मनोगतावर कुठले जीवन-मरणाचे प्रश्न चर्चिले जातात?

परंतु हा प्रश्न उरतोच. ते वास्तव स्वीकारत नाही हाच तर त्याहूनही मोठा प्रश्न आहे.

एक मराठी माणूस म्हणून तुमच्या विचारांचा आदर करतो.

मला वाटते मागे "भाषावार प्रांतरचना" ह्या विषयावर तुम्हीच लिहिले होते. ह्या विषयाला काहीसा निगडीतच विषय होता तो.