मला असे वाटते की तुम्हाला माझा मुद्दाच समजला नाही.

मी इतर लोकांनी महाराष्ट्रात येऊ नये असे म्हटलेले नाही. ग्लोबलायझेशन बद्दल दुमत नाही. फक्त त्यांनी स्थानिक लोकांच्या भाषेचा आदर करावा व ती शिकायची संधी मिळाली तर जरूर शिकावी हा माझा मुद्दा आहे.

मद्रास मध्ये लोक तमिळ शुद्ध बोलत नसतील तर ते बरोबर असे थोडेच आहे?

मराठी सुद्धा इतर भाषांमधले शब्द सामावून घेतच आहे.

प्रश्न हा आहे की इतर लोकांनी मराठीचा आदर करण्याचा आणि गरजेपुरते मराठी बोलण्याचा.

तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हिंदी प्रमाणे इतर सगळ्या भाषा राष्ट्रभाषा आहेत. मग बाहेरच्यांना मराठी शिकण्यात कमीपणा तो कसला? आपण जसा हिंदीचा आदर करतो तसाच तो इतर लोकांनी मराठीचा करायला नको का?

ग्लोबलायझेशन म्हणजे मराठी विसरून हिंदीच्या मागे पळणे तर नव्हे ना?