मी दिलेल्या काव्यपंक्ती प्राचीन संस्कृतप्रचुर मराठीतील आहे. कालौघात तिच्यावर संस्करणें होऊन, ती जशीच्या तशी राहिली नसण्याची शक्यता जिज्ञासूंनी ध्यानांत घ्यावी. तिचा अधिकाधिक तंतोतंत अर्थ देत आहे, तो असा.
हस्ति - हांती, हस्तिन्द्रायुध - हत्तीचा मालक माहूत (वाच्यर्थाने) त्यचे आयुध अंकुश (सत्ता) (नाही), नारीपती - नर, मृगान्तक - सिंह त्याचे मुख (असा नरसिंह, त्याचा रिपु - हिरण्यकश्यपु, त्याचे नामपूर्वाध हिरण्य म्हणजे धन हांती नाहीं.
त्यालागीं - त्यामुळें, क्षमा - पृथ्वी, सुता - तिची मुलगी सीता, तिचा ईश (पति) राम, त्याचा रिपु - रावण, त्याचा अनुज कुंभकर्ण, त्याची प्रिया- झोप येत नाही.
चटका फार जोराचा नाहीं ना बसला. (मी हे विनोदाने म्हणतो आहे! )
कळावें,
वडुलेकर