संजोपराव,
जी एंच्या एका 'बड्या ख्याला'ला उजाळा दिल्याबद्दल आभार...
पूर्ण कथा उधृत करण्याचे कष्ट तुम्ही घेत आहात; या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते ते सुद्धा लिहिलेत तर फार आनंद होईल.
मागे तुमच्या एका लेखाला उत्तर देताना मी काही प्रश्न केले होते. तेच पुन्हा एकदा विचारतो :
जी एंच्या कथानुभवाची व्याप्ति अशी आहे की, विचार करणाऱ्या प्रत्येकास आपले "दोन पैसे" जरूर द्यावेसे वाटतील. या एका गहन अशा बाबीबद्दल काही मुद्दे -
ग्रीक शोकांतिकांचा जी एंवरील प्रभाव (प्रवासी/इस्किलार च्या निमित्ताने या विषयी बोलता येईल.)
तथाकथित अस्तित्त्ववादाचे जी एंच्या एकूण "भूमिके"शी असणारे नाते
जी एंच्या आणि एकूणच मराठी साहित्यातील , त्यांच्या रूपककथांचे स्थान
व्यक्तिश: तुम्हाला जी एंच्या 'संसारकथा' आवडतात ; की रूपककथा ?