प्रियाली,

आपल्या अवती-भवति अशी उदाहरणेही आढळतात. त्यामुळे हा विषय काहीसा जुनाच वाटला तरीसुद्धा ज्या व्यक्तीवर असा प्रसंग येतो त्या व्यक्तीला दिव्यच पाहावे लागते. यावरून कविवर्य कै.सुरेश भटांची एक गज़ल आठवते -

भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

अपेक्षांच्या ओझ्यामुळे संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. त्याला आई आणि मुलगी हे नातंदेखील अपवाद होत नाही हा आशय पत्रात नेमका व्यक्त झाला आहे.

पत्राच्या रूपात विचार मांडण्याची कल्पना आणि लेखनाची शैली आवडली.