नेट-सेट मधून नेमके काय साध्य होते हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मिलिंद यांनी म्हटल्याप्रमाणे यातून शिकवण्याच्या पात्रतेचा बोध होत नाही. शिवाय आपल्याकडे बाकीचे निकषही आहेत. राखीव जागा वगैरे. पण त्याबद्दल बोलल्यास विषयांतर होईल.

पाश्चात्य देशांमध्ये निकष वेगळे आहेत. क्ष शोधनिबंध, त्याच बरोबर ते कुठल्या दर्जाच्या जर्नलमध्ये (शब्द?) प्रसिद्ध झाले हेही महत्त्वाचे ठरते. उदा. Science, Nature यामधील शोधनिबंधांचे महत्त्व नक्कीच जास्त धरले जाईल. दुसरा निकष म्हणजे तुमचा आधीचा अनुभव, research projects मधली कामगिरी इ. जर तुम्ही एखाद्या जर्नलसाठी referee (पंच?) असाल तर तीही जमेची बाजू. तिसरा आणि महत्त्वाचा निकष म्हणजे तुम्हाला ३ किंवा जास्त शास्त्रज्ञांची नावे द्यावी लागतात जे विचारणा केल्यास तुमच्याबद्दल अभिप्राय देऊ शकतील.  ह्या सर्व निकषांचा परिणाम म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये पद मिळणे ही बरीच अवघड गोष्ट आहे.

हॅम्लेट