तुम्ही शेपटी तुटलेल्या कोल्ह्याची गोष्ट ऐकली आहे काय?

मी गेले काही दिवस तुमचे मनोगतावरचे लेखन वाचतो आहे. मराठी तितकेसे प्रवाही नसूनही तुम्ही इथे भाग घेत आहा, मराठी संकेतस्थळ सुरू करता आहात हे पाहून कौतुक वाटत होते.

मनोगत आणि त्याचे सभासद यांचे पुरवठेदार आणि ग्राहक असे नाते आहे हे तुम्हाला कोणी सांगितले? वर आनंदयात्री यानी म्हटल्याप्रमाणे मराठीच्या संवर्धनासाठी मनोगत काम करते आहे. येथे ग्राहकसंबंध नसल्याने, ग्राहकाला काय हवे हा प्रश्न निरर्थक आहे. नवे नवे शब्द अमलात आणून धीमेपणाने न संकोचता वापरत राहणे ह्यात काहीही चूक नाही.

तुम्ही शुद्धलेखन कशाला? भाषांतर कशाला? हा जो सूर लावता आहात, त्याचे कारण, तुमच्या संकेतस्थळावरचे तुमचे शुद्धलेखन वाचून समजले. शेपटी तुटलेला कोल्हा शेपटी कशासाठी असे इतर कोल्ह्यांना सांगतो त्यातला हा प्रकार आहे.

परखड बोलल्याबद्दल राग येणे स्वाभाविक आहे; पण तुम्हाला मराठीच्या गुणवत्तेपेक्षा माणसे (ग्राहक) जमवणे महत्त्वाचे असल्याने तुम्ही स्पष्ट भूमिका न घेता आता 'जाऊद्या, गुण्या गोविंदाने घ्या' असा सूर लावाल असे वाटते.

माझे मत हे तुमच्या वैयक्तिक विरोधात नसून तुम्ही मांडलेल्या मुद्द्याच्या विरोधात आहे ह्याची जाणीव ठेवावी ही नम्र विनंती.