मला मनोगत हे सेवादाता व मनोगती हे ग्राहक आहेत( जरी मनोगत मोफत असले तरी ) असेच लिहायचे होते, वर जे मी मनोगत संदर्भामध्ये लिहले आहे ते फक्त उदाहरण म्हणून दिलेले आहे व मला असे वाटत आहे की तुम्ही मझे मत संपुर्ण वाचले नाही व मी शुद्ध लेखनाच्या विरोधात ही नाही, माझे म्हणणे ईतकेच आहे की अति आग्रह चांगला नाही व मी ह्यावर उपाय देखील मांडला आहे जसे की जे शब्द बोली भाषेमध्ये रोजच उपयोग होतात ते तसेच राहू द्यावेत व जे नवीन शब्द नवीन तंत्रासाठी वापरण्याचे आहेत ते प्रकाशीत करावीत अथवा लोकांपर्यंत पोहचवावेत. एवढेच माझे म्हणणे आहे. ( भारतामध्ये सहा कोटी महाजाल उपभोगता आहेत. ह्यामध्ये मराठी वापर कर्ता हा फक्त ५% असावा.)

बाकी उदाहरणासंबधी लिहायचे तर तेली हा तेलाबद्दल बोलणार, कुंभार माती बद्दल तसाच मी माझा व्यवसायच संगणक क्षेत्राचा आहे त्यामुळे मी त्या क्षेत्रातील उदाहरण दिले.

असो, आपले परखड मत कळाले व मला त्याचा राग ही नाही.

माझ्यासंकेतस्थळावर आपण भेट दिलीत धन्यवाद पण आपला अभिप्राय हा त्याच जागी दिला असता तर चांगले झाले असते.

तुम्ही शेपटी तुटलेल्या कोल्ह्याची गोष्ट ऐकली आहे काय?

नाही. तेव्हा ती ही मनोगतावर ठेवावी.