फार महत्वाचा विषय ! वजन थोडे कमी झाले तरी काही काळाने लगेच पुर्वपदावर येते. व्यायामाच्या बरोबरीने खाण्याचे नियोजन फार महत्वाचे आहे. पण परदेशात पार्टीत गेल्यावर अवघड जाते. नुसते खूप सॅलड खाऊन पोट भरल्यासारखे वाटत नाही. परदेशात उपवासाच्या दिवशी अनेकवेळा बटाटा चिप्सना नाईलाजाने शरण जावे लागते. मनोगतावर मी खुपदा मदतीला येतील अशा पाककृतीचा शोध घेतला पण स्वयंपाकाचे जुजबी ज्ञान आणि मुळातील उत्साह (?) यामुळे शेवटपर्यंत डाळ शिजली नाही. कुणाला यशस्वी मार्ग सापडला असेल तर सांगावा ही विनंती.
अभिजित