सकाळी १०॥ - ११ ला एक (किंवा २) व्हेज. सँडविच आणि ७॥ - ८ला रात्रीचे जेवण (२ पोळ्या, भाजी, अर्धीवाटी भात आणि वरण) १० वाजता झोपणे.

दिवसातून १ चहा सकाळी साखरेचा, एक संध्याकाळी बिन साखरेचा.

महिन्यातून एकदा २ पेग व्हिस्की, पाण्यातून. (नो बिअर, रम, वाइन) (वैकल्पिक)
तळलेले पदार्थ नाही.
व्हिस्की बरोबर उकडलेल्या अंड्यातील फक्त पांढरे, मिरपूड घालून. (८-१० अंड्यातील पांढरे चालू शकते.) (वैकल्पिक)

सकाळी ५॥ वाजता उठून ४५ मिनिटात ५ किलोमीटर चालणे, तसेच संध्याकाळी ५॥ला पुन्हा तितकेच आणि तेवढ्याच वेळात चालणे.

हा ६ महिने वापरून पाहिलेला यशस्वी फॉर्म्युला आहे.
पण सातत्य राहत नाही त्यामुळे वजन पूर्ववत होते. पण हे व्यक्तीगत अपयश आहे, फॉर्म्युलाचे नाही.