जरूर असाव्यात. जगाशी स्पर्धा करताना वेळोवेळी होणारे बदल स्विकारलेच पाहीजे. ते अपरिहार्य आहे. परंतु हे करताना एका रात्रीत करु नये,त्याचा फटका एका पिढीला बसु शकतो. राज्यशासनाचा अभ्यासक्रम पहा आणि सी.बी. एस. सी., आय. सी. एस. ई. यांचे अभ्यासक्रम पहा आणि मग मेडिकल एन्ट्रन्सला मराठी मुलांची होणारी कुचंबणा पहा. ते नववीत शिकतात ते येथे बी.एस्सीला शिकतात . याचा अर्थ येथील बी.एस्सीचा विद्यार्थी हा तेथील नववीच्या विद्यार्थ्याबरोबर ! योग्य मार्गदर्शनाशिवाय हुशार विद्यार्थ्याचेही नुकसान होऊ शकते. चांगले मुरलेले लोणचे खाल्ले तर चव येते ,पण न मुरलेले लगेच खाल्ले तर खोकल्याचा त्रास होऊ शकतो. बदलत्या काळाचा सतत आढावा घेणे हे शिक्षणतज्ञांचे आद्य कर्तव्य आहे.
अभिजित