१. सकाळ व संध्याकाळ चहातून फक्त १ चमचा साखर घेणे. - करतो आहे.
२. उकडलेला भात एकदाच अर्धी वाटी खाणे. - करतो आहे.
३. कणीक भिजवताना तेल न घालणे. - करून पाहिन.
४. भाजी करताना टीस्पूनने मोजून तेल घालणे. - करून पाहिन.
५. कोक-कूकीज-चॉकलेट पूर्णपणे बंद करणे. - बंद आहे.
६. बटाटा चीप्स पूर्णपणे बंद करणे. - बंद आहे.
७. सर्व मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याचे बंद करणे. - प्रयत्नात आहे.
८. डाळी-उसळी खाणे. - आवडीने खातो.
९. उकडलेल्या अंड्यातील फक्त पांढरा बलक खाणे. - शक्यतो, अंडी खातच नाही.
१० दिवसातून फक्त २ पोळ्या खाणे. - फारच कमी वाटतय.
११ बाहेरचे खाणे महिन्यातून एकदा - हे कधी जमेल, देव जाणे.
आम्ही एका पुस्तकाच्या आधाराने प्रयोग केले त्यानुसार फायदा होत आहे.
फायदा होत आहे म्हणजे? वजन कमी होत आहे की, वाढायचे थांबले आहे? ह्या सोबत काही व्यायामही आहे की नुसतेच डाएट?