सारे मुद्दे एकदम बरोवर आहेत. आणखी काही:

१. रात्रीच्या जेवणात पोळी,भात टाळणे अश्यक्य आहे, पण कमी घ्यावा.

२. प्रत्येकी ४ तासांनी तरी पोटात काहीतरी गेले पाहिजे( चांगले ना? ) पण त्यात एखादे बिस्कीट, फळ वगैरे चांगले. जास्त वेळ उपाशी राहिल्याने पचनशक्ती कमी होते.उपवासाच्या दिवशीही दर थोड्यावेळाने एखादे फळ खावे. तेही केळी,आंबा सोडून.

३. आपल्याकडे जेवणात साखर, खोबरे,शेंगदाण्याचा कूट नियमित घालतात. या गोष्टी रोजच्या भाजीत घालणे टाळावे/कमी करावे.

४. बाकी परदेशात, सॅलड खावून पोट भरत नाही हे मान्य, त्यासोबत एखादे शाकाहारी सूप घ्यावे किंवा शाकाहारी/अंड्याचे सॅंडविच पण खाता येते ( पण ब्रेड गव्हाचा असावा, मैद्याचा/नेहेमीचा नको.पिझ्झापेक्शा पास्ता खाता येईल. आणि फळे तर नेहेमीच खाता येतात.

५.आणि हो, पाणी जास्त प्यावे.

बरं, आता मी इथेच थांबवते, नाहीतर यादी पाहूनच वजन कमी होईल.

:-)

-अमामिका.