एकलव्यजी,
या परीक्षा (ग्रंथालय व माहिती शास्त्र  विषयातील  प्राध्यापक पदासाठी)  मी स्वतः  तीनदा दिल्या आहेत, देव पावला नाही ही गोष्ट वेगळी; पण परीक्षा अवघड नाहीत हे जाणवले. पण या परीक्षांची पद्धत मला चुकीची वाटते.
१) आजपर्यंत १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी ३ तास वापरण्याची सवय लागलेली आणि सेट-नेट मधील २०० गुणांच्या  तिसऱ्या प्रश्नपत्रिकसाठी दिला जाणारा वेळ मात्र अडीच तासांचा, ही गोष्ट विचित्र वाटते.
२) पहिल्या प्रश्नपत्रिकेत(प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रच असते) किमान काही गुण  मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचीच दुसरी उत्तरपत्रिका तपासली जाते. तोच निकष वापरून  तिसऱ्या     उत्तरपत्रिकेचा विचार केला जातो. त्यातही विशिष्ट इतके ( माझ्या माहितीनुसार किमान ५५ %) गुण मिळविणाराच उत्तीर्ण समजला जातो.
 उरलेले सर्व नापास ठरतात. यातील दुसऱ्या मुद्याविषयी तडजोड होऊ नये, पण २०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या वेळेत काही सुधारणा व्हावी असे वाटते.
 अवधूत.