फायदा होत आहे म्हणजे? वजन कमी होत आहे की, वाढायचे थांबले आहे? ह्या सोबत काही व्यायामही आहे की नुसतेच डाएट?
आमचे दोघांचेही वजन ५-६ महिन्यामध्ये ४ किलोने कमी झाले. "लढा साखरेशी" या पुस्तकामध्ये साधारण माणसाचा आहार २००० कॅलरीजचा हवा. पण वजन कमी करायचे असेल तर १३००-१४०० कॅलरीजचा आहार घेतला पाहिजे असे लिहिले आहे. रोजच्या रोज वहीत काय खाल्ले व त्याच्या कॅलरीज किती झाल्या, किती कॅलरीज जळाल्या याची नोंद ठेवली. पण आता १६००-१८०० कॅलरीज आहार सेट झाला आहे. आणि या आहारानुसार आता वजन वाढत नाही. ठराविक वजन काही महिने असा डाएट व व्यायाम केला असता कमी होते. आणि एकदा कॅलरीजचा अंदाज आला की मग वजन स्थिर होते. कमी व जास्त होत नाही. १३००-१४०० चा आहाराचा प्रयोग करताना खूप जड गेले. अशक्तपणा जाणवला. पण १६००-१८०० कॅलरीजचा आहार घेताना अशक्तपणा येत नाही. आहार ४ वेळेला घेणे. त्याने जास्त फायदा होतो.
व्यायामाच्या बाबतीत पण बरेच प्रयोग केले त्यानुसार एकच एक व्यायाम नेहमी केला की तो नियमित होत नाही या वयात. पूर्वी रोजच्यारोज व्यायाम होत होता. सध्या तरी १ दिवस सूर्यनमस्कार-जोर-बैठका, १ दिवस विश्रांती, १ दिवस अर्धा तास चालणे परत एक दिवस विश्रांती. असा व्यायाम नियमित होईल असे वाटते. त्यात अजून एकाची भर घालून पहाणार आहे ती म्हणजे योगासने. म्हणजे एक दिवस विश्रांतीनंतर परत १ दिवस आसने, १ दिवस विश्रांती.
यातून कोणत्याही प्रकारचा ताण शरीरावर येत नाही त्यामुळे व्यायाम करावासा वाटतो व नियमित होण्याकडे कल वाढतो.