इतर भाषांचे असंख्य शब्द  आता पर्यंत मराठीत रुळले. याचा अर्थ ते महाराष्ट्रीय उच्चारांना भावले.  विविध प्रत्यये लावून  शब्दांचे सामान्य रूप होते. या सामान्य रूपांचा वापर करताना जीभ अडखळणार नसेल असे कोणतेही शब्द वापरण्यास हरकत नाही. शब्द इंग्रजी असो वा मराठी तो बोलताना क्लिष्ट वाटू नये हि प्राथमिक कसोटी.

भाषांतर करण्या मागे  मराठी भाषेची आस्था हा एक महत्त्वपूर्ण  भाग आहे.उलट मराठी भाषिकांचे प्रयत्न जगातील इतर असंख्य भाषांच्या मानाने ०.१ टक्कापण भरत नाहीत हिच वस्तुस्थिती आहे.तरीपण संगणक तंत्रज्ञान अशा मानवी अनास्थेवर मर्यादित तांत्रिक  तोडगे पुरवू शकते. घोड्याला पाणी दाखवण्याचे काम शब्दकार मनोगती करत आहेत.घोड्यांच्या मराठी कळपांनी प्यायचे का नाही त्यांचे त्यांनी ठरवावे.

मराठी मला नाकारायची असेल तर  इंग्रजी भाषेचीच दीक्षा मातृभाषा म्हणून घेईन.भाषेत बदल करणे सोपे असते उच्चारात बदल करणे सोपे नसते. इंग्रजी भाषेचीच दीक्षा मातृभाषा म्हणून   घ्या आणि तरी तुमचे उच्चार बंबय्या इंग्रजीच म्हणवले जातील. 

सर्वच इंग्रजी बोलणारे लोक श्रीमंत होत नाहीत ह्याचा साक्षात्कार सर्वजण इंग्रजीत बोलल्यानंतर होईल.फक्त इंग्रजीच राष्ट्रभाषा असलेले असंख्य देश (बोटावर मोजण्या इतके गोऱ्यांचे देश सोडून) आणि त्यांचे देश वासिय  दारिद्र्य रेषेखाली सडत आहेत हे एकदा कॉमनवेल्थचा आर्थिक फेरफटका मारला म्हणजे उमजते.

तो पर्यंत 'कालाय तस्मै नम:'

-विकिकर