फारच छान! अगदी सर्वांना पटेल अशी कविता!
खाउनी पान मग पिचकारी
मारण्या इथे होई चोरी
ओरिसात स्त्रीपुरूष सर्वच जण पान खातात. दिवसभराची 'पाने' तयार करून/करवून जवळ ठेवतात. तरीही जरूर पडली तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सांगून मागवूनही घेता येतात. बरेचदा तोंडात पान ठेवूनच बोलतात. समोरच्या माणसाला- तो स्वतः पान खाणारा नसेल तर- सारखी भीती की कुठल्याही क्षणाला रंगपंचमी होईल की काय! फारच तोबरा भरलेला असेल तर बोलणं म्हणजे नुसतंच 'हुं हुं'. त्याचा अर्थ काहीही घ्या! आणि पिचकाऱ्या तर कुठेही. कधीकधी बसमधून पादचाऱ्यांचा विचार न करता टाकलेल्या. जिन्याच्या मिडलँडिंगच्या कोपऱ्यात तर भिंतीचा मूळ रंग कोणता ते कळणारच नाही. सचिवालयातही हेच 'चित्र' दिसायचं; पण त्यावर उपाय म्हणून सचिवालयातील अशा कोपऱ्यांमध्ये जगन्नाथ, गणपती, चाँदतारा, क्रॉस, साईबाबा (दोन्ही -शिर्डीचे आणि सत्य) इ. अशा सर्व धर्मीयांच्या, सर्व पंथीयांच्या श्रद्धास्थानांच्या प्रतिमा भिंतीवर काढल्या. त्यानंतर त्या कोपऱ्यांमध्ये पिंका टाकणे बंद झाले. (पब्लिक धार्मिक असण्याचा असा फायदा होतो खरा! अर्थात हा उपाय सगळीकडेच लागू पडेल असे नाही.)