१. संपूर्ण व्यवहारी जगात कुणालाही फुकट १०० रुपये देणारा एकलव्यच असणार नाही. जो तो मोबदल्याची अपेक्षा ठेवेल.
२. संपूर्ण प्रामाणिक जगात कोणीही फुकट पैसे घेणार नाही. राम श्यामला सर्व १०० रुपये देऊ करेल व तो ते घेणार नाही. ते एकलव्याकडेच राहतील.
३. माणुसकी भरलेल्या जगात एकलव्याकडे जास्तीचे पैसे असतील व कोणाला तरी देण्याची इच्छा असेल असे समजू. राम व श्याम यांना किती आवश्यकता आहे किंवा ते त्याचा किती सदुपयोग करू शकतील याचा विचार करून ते हिस्से ठरवतील आणि सहमत होतील.
४. खऱ्या जगात सरकार, प्रकल्प अधिकारी व प्रकल्पग्रस्त किंवा जमीनीचा मालक, बिल्डर व अतिक्रमण करून बसलेले झोपडपट्टीवाले असे या प्रकारचे त्रिकोण असतात. ते कधी कोणाच्या जोरावर सुटतात तर कधी सहमति न झाल्यामुळे लोंबकळत राहतात.