चर्चाविषय आधी मांडलेला असल्यामुळे मुलीच्या वयावर टिप्पणी करण्याकडे तुम्ही सुचवल्यानुसार दुर्लक्ष करत आहे. मात्र तुमची पहिली दोन वाक्ये वाचून प्रश्न पडला की "लग्न ही गोष्ट सर्वांच्याच जीवनातील महत्त्वाची घटना असते." असे असेल आणि सर्वांमध्ये मुले-मुली दोघांचाही समावेश असेल तर ""एकदाचे लग्नाचे वय झाले की (फक्त) मुली(च) बघायला जाणे, हे ते सर्व कसे काय करतात? मला वाटले होते की सर्वांमध्ये समावेश असलेल्या मुली ह्या मुले बघायली जात असतील. की ही चर्चा केवळ तरूण मनोगती पुरूषवर्गासाठी आणि त्यांच्याच दृष्टीकोणातून लिहिलेली आहे?

जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली असली आणि वयाने मोठी असली तर तुम्ही घरच्यांचा विरोध जुमानून लग्न केले पाहिजे ही विरोधाला न जुमानता लग्न केले पाहिजे असे म्हणायचे आहे?