आपल्याला कदाचित माहिती असेलही, पण नसेल तर , कदाचित हे उपयोगी पडू शकेल.

जपानी लोकं अनेकवेळेला त्यांची 'जपानी - इंग्रजी' अशी एक लहानशी 'शब्द सूची / Dictionary घेउनच वावरतात. आणि  त्याची न लाजता मदत घेतात.

आपल्यालासुद्धा आता तशीच वेळ आली आहे. फक्त फरक इतकाच कि , (दुर्दैवाने) आपणाला 'इंग्रजी - मराठी' अशी शब्दसूची  वापरावी लागेल.

असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर ते सहज जमू शकेल.

कुणाला जर अशी लहानशी (खिशात मावणारी / खिशाला परवडणारी) माहीती असेल तर मला अवश्य कळवा. (सुधारणेची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच करावी म्हणतो ....!!!!)

प्रसाद