दिवसभर माहितीजालाशी संपर्क साधता आला नाही. आता या चर्चेवरील प्रतिसाद आणि व्य. नि. वाचले.
'शब्दांनी फक्त शब्द पोचवता येतात, बाकी काहीही पोचवता येत नाही' असे व.पुं. चे वाक्य आहे ( मित्रहो, कृपया हे वाक्य त्याच्या दर्शनी मूल्यावर घ्या. याला कुठलेही पूर्वीचे आई, चिन्मयी, प्रियाली, सन्जोप, टीकाराम, तात्या, सर्किट, जान्हवी, तेजिंदर, नाडगौडा बाई, श्रीकांतकाका असे संदर्भ लावू नका!). आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या सद्भावनांबद्दल मी आपला ऋणी आहे. चिकुनगुनियाबरोबरची लढाई मी जिंकत आलो आहे. आपल्या पाठिंब्यावर मी लवकरच ठणठणीत होईन अशी खात्री वाटते. पुनश्च आभार.