नमस्कार मनोगतींनो. वरील सर्व वाचले. मात्र मला स्वत:ला वजन कमी करणे मुळीच अवघड गेले नव्हते. त्याबाबत लिहावेच असे वाटल्याने लिहीत आहे.

वजन कमी करणे फारच सोपे आहे.

त्यासाठी कमी खावे लागत नाही.

तेल, तूप, स्निग्ध पदार्थ, साखर आणि मीठ (मीठ मुळात एवढे वाईट नाही, मात्र ते कायमच तेलकट पदार्थांच्या सोबतीने खाल्ले जात असल्याने वाईट) हे पदार्थ तीन सप्ताहांपर्यंत सातत्याने खाल्लेच नाहीत तर वजन आपोआप घटू लागते.

मग खावे काय? काहीही. कच्ची काकडी, गाजर, मुळा, पालेभाज्या, फळे, मोड आलेली धान्ये, भाजलेले पापड, गाईचे दूध( अर्थातच बिना शक्कर, जमल्यास हळद घालून), रताळ्याचे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये भाजलेले पापड, पॉप कॉर्न अनंत आणि असंख्य पदार्थ, दिवसातून सारखे चरत राहावे.

जर तुम्ही तोच आहार कायम सुरू ठेवू शकलात तर ते योग्य वजनावर येईस्तोवर घटतच राहते.

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर पेलाभर पाणी लिंबू आणि मध घालून अवश्य प्यावे.

इतर व्यायाम वगैरे बाबी कराव्यातच मात्र महत्त्व योग्य तेच खाण्याला जास्त आहे.

योग्य तेच खाईन. हवे तेवढे खाईन. उपाशी मुळीच राहणार नाही. असे धोरण ठेवावे. अर्थातच मधुमेहींना एवढे स्वातंत्र्य नसते. हे बाकी खरेच.

असल्या प्रकारामुळे माझे वजन दरमहा दीड किलोने घटत घटत आता ६४ वर स्थिरावले आहे. आहार अजुनही तसलाच राखला आहे. मात्र उ:शाप मिळाल्यागत किंचित सैलावून.