हे आधी पहिलं पाहिजे. आपल्या शरीरात फॅट आणि मसल-मास असे दोन्ही प्रकार असतात.  माझ्यामते वजन कमी करण्यामधे 'फॅट' कमी करणे हे अभिप्रेत असावं. एखादा बॉडीबिल्डर वजनाने भरपूर असू शकतो पण त्या वजनात मसल-मास चं प्रमाण जास्त असतं.

मला खालील गोष्टींचा फायदा झाला आहे.

१. कार्डियो आणि वेट ट्रेनींग आलटून पालटून करणे. वेट ट्रेनींग ने मसल-मास वाढतो तसचं मेटॅबॉलिझम पण वाढतं. मसल्सवरती फॅट साठण्याचं प्रमाण कमी होतं

२. No Diet. नियमीत आणि हेल्दी जेवावं. नुसते उपास केले तर दैनंदीन उर्जेच्या गरजेसाठी शरीर मसल-प्रोटिन्स वापरतं कारण फॅट पेक्षा ते ब्रेक-डाऊन करणं सोपं असतं.

३. प्रोटिन्सयुक्त पदार्थ जास्त खावेत. अनुभव असा आहे की असे पदार्थ खाल्ले की पोट भरल्याची जाणीव पण लगेच होते. उ.दा गोड पदार्थ किंवा फ्राईज आपण किती खात आहोत याची जाणीव व्हायला वेळ लागतो.

अजूनही काही गोष्टी आहेत पण आताअ जरा आलोच आहे तर ऑफिसचं काम करतो :-)