मलयाळम् भाषेत लिहिताना गावाचे नाव कालटी असे लिहिले जाते मात्र उच्चारताना ते कालडी असे म्हटले जाते. ट चा बोलीभाषेत ड असा उच्चार होतो! (तसेच क चा ग, त चा द वगैरेही!)
विरभि, शंकराचार्यांसारख्या कर्तृत्ववान माणसाला चमत्कारांची जंत्री देणाऱ्या बुवाबाबांच्या पंगतीला बसवू नये असे मनापासून वाटते. संवाद अतिशय सुंदर आहे. पण त्यातल्या चमत्काराच्या भागाचे तार्किक स्पष्टीकरण दिले असते तर आवडले असते.