कोनाप्रमाणेच कोण असाही शब्द मराठीत त्याच अर्थाने वापरला जातो असा प्रवाद ऐकला आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी लोकसत्तामध्ये कुमार केतकरांच्या अग्रलेखाच्या शीर्षकामध्ये पंचकोण असा शब्द वाचल्याचे आठवते. मला चौकोण आणि पंचकोण हे शब्द खटकतात, मात्र ते चूक आहेत वा नाहीत, ते कधी वापरावे ह्याबद्दल नियम वगैरे माहीत नाहीत.