तुमच्या घरातला टीव्ही चोरीला गेला आणि तुम्ही चोरामागे त्याला पकडायला धावलांत तर 'टीव्हीप्रधान' संस्कृती जन्माला येईल का हो?
बायकांमुळे युद्ध झाली हे आधी चूक त्यातून तुम्ही निवडलेल्या बायकाही चूकच असाव्यात का हो?
म्हणजे ट्रॉयचे युद्ध हेलनच्या माथी का? ते पॅरीसला लालूच दाखवणाऱ्या ऍफ्रोडाईटीच्या माथी मारा ना. किंवा रामायण सीतेच्या माथी का ते ही कैकयी किंवा मंथरेच्या माथी मारा ना.
त्याही पेक्षा कशाला केलं त्या दशरथाने कैकयीशी लग्न? आणि कशाला दिले ते वर? म्हणजे दशरथच जबाबदार धरला पाहिजे. वा! वा!
महाभारतातही कशाला द्रोणांना हवा होता सूड, आणि त्या द्रुपदाला तरी. त्यांच्या वैरातून द्रौपदीचा जन्म झाला. तेव्हा तेच कारणीभूत.
इतकं सोप आहे का हे गणित? की घेतली दोन चार महाकाव्ये आणि बांधले आडाखे?