याचा पुरेसा बोध झाला नाही!:-
मी मान्यकरतो, की संस्कृतीची सविस्तर चर्चा करण्याकरता मला खूप लिहावे लागेल, खूप स्पष्टीकरण करावे लागेल. आणि तेवढा वेळ / संयम माझ्याकडे आता तरी नाही.
पण तुम्हाला सोपा उपाय सांगू शकतो - तुम्ही ज्ञानेश्वरी - गीता वाचन केल्यास तुमचे खूप प्रश्न आपोआप सुटतील.
संस्कृती ही त्या त्या समाजातील माणसांच्या आचार-विचारातूनच घडत असते नाही का? :-
- माझ्या माहिती प्रमाणे, हे चूक आहे.
उदा:-
१. भारतात लाच लुचपतीचे प्रमाण खूप जास्त आहे. लाच देणे घेणे हि काही लोकांची आचार - विचार सरणी आहे.
=> हे आपल्या संस्कृतीत आहे का?
२. खूप लोक खोटे बोलतात, फसवतात - काहींना त्याचा अभिमान वाटतो
=> हे आपल्या संस्कृतीत आहे का?
अशी खूप उदाहरणे देतायेतील. आणी तुम्ही म्हणता तसे, हे लोकांच्या आचारात व विचारात असते! पण हि आपली संस्कृतीत नाही.
माझ्या मते, संस्कृतीचा जन्म धर्मांतून होतो. म्हणून, हिंदू संस्कृती पूर्णं समजण्याकरता, हिंदू धर्म समजला पाहिजे.
हिंदू धर्म समजण्या करता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, विचार करणे, समजून घेणे जरूरी आहे.