पेटन प्लेसच्या संदर्भाचा जी एंच्या या कथेच्या भावाशयाशी काही संबंध नाही.
दत्तूच्या व्यासंगी वृत्तीबरोबरच, त्याच्या व्यासंगाशी विसंवादी असणाऱ्या त्याच्या लौकिक आयुष्याचे , त्या आयुष्यातील सततच्या चणचणीमुळे त्याच्या व्यासंगालाही कशी मुरड दत्तूसारख्याना घालावी लागते याचे दर्शन 'पेटन प्लेस'चे निमित घेऊन जी ए घडवीत आहेत. पेटन प्लेस च्या ऐवजी इतर कुठल्याही अभिजात आणि सामान्याना न परवडण्याइतपत महाग पुस्तकाचाही संदर्भ तिथे चालला असता. पेटन प्लेस हा मुददा नव्हे; मुद्दा आहे दत्तूच्या रखरखीत, सर्व आशा-आकांक्षा जळून खाक होण्याच्या प्रोसेस चा अजून एक क्षण.