मूळ तत्सम शब्द 'कोण' आहे. 'कोन' अशुद्ध/अपभ्रष्ट रूप आता मराठीत रूढ झाले
आहे. दृष्टिकोण, दृष्टिकोन हे दोन्ही शब्द बरोबर आहेत. सवय नाही म्हणूनच
'त्रिकोण', 'षटकोण' किंवा 'पंचकोण' हे कानांना खटकत असावेत.
'त्रिकोणीय', 'पंचकोणीय' अशी विशेषणे बरोबर आहेत, असे वाटते. 'त्रिकोनीय', 'पंचकोनीय' अशी विशेषणे लिहू नयेत, असे वाटते.