जीवन जिज्ञासा ,

आपला उपक्रम आणि लेख अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे.खास करून शब्द व्युत्पत्तीत आणि नवीन पारिभाषिक शब्द चर्चेत रस असलेले मनोगतींना निश्चितच उपयुक्त आहे. असाच काहीसा प्रयत्न मराठी विकिपीडियावर सुद्धा सुरू आहे.

*काही शंका

*स्वरसंधी आणि संयुक्त स्वर यातील साम्य आणि फरक कोणते?

*मराठीत नव्याने वापरले जाणारे ऍ आणि ऑ  यांचा व संयुक्त स्वर वेगळे असतील तर संयुक्त स्वरांचा स्वरसंधीवर काय परिणाम असू शकतील?

अ+आ, अ+इ, अ+उ, अ+ए, अ+ओ, अ+ऍ, अ+ऑ,

आ+अ, आ+इ, आ+उ, आ+ए, आ+ओ,  आ+ऑ

इ+अ, इ+आ, इ+इ, इ+उ, इ+ए, इ+ओ, इ+ऍ, इ+ऑ

उ+अ, उ+आ, उ+इ, उ+ए, उ+ओ, उ+ऍ, उ+ऑ

इत्यादींनी तयार होणाऱ्या काही  संयुक्त स्वरांना;  काही त्रोटक आणि दीर्घ स्वरांना, तसेच 'देव' आणि 'पाव' वर्गीय स्वराभासांना मराठीत स्वतंत्र लिपीचिन्हे नाहीत असे वाटते.तर त्यातील काहींना नुक्त(किंवा इतर काही वेगळे) चिन्ह वापरता येतील किंवा कसे? 

* आपल्या लेखातून विकिपीडियातील मराठी व्याकरण विषयक लेखांकरिता उचल करण्यास मान्यता द्यावीत हि नम्र विनंती.

आपला,

विकिकर