लुकण हा सिमेंटला प्रतिशब्द अगदी बरोबर आहे. जरा वेगळा वाटतो तरीही सततच्या वापराने रूढ करता येईल. पण प्रश्न असा आहे की आपण तसें करण्यास स्वतःलाच उद्युक्त करणार कां ? आणि भोवतालची माणसें त्याचा स्वीकार करणार कां ? मी ' मेजावरची फुलदाणी छान आहे' असं एके ठिकाणी म्हणालो तर एल-बी-डब्ल्यु झालो. लगेच' ते टेबलावरच्या फ्लॉवरपॉट बद्धल बोलताहेत' अशी यजमानांनी कुचेष्टावगुंठित-प्रशंसा केलीच. तेंव्हा आपण ' लुकणाची गोणी ' कुठून आणणार !