परित्यक्ता देवा विविधविधि सेवा कुलतया। भया पंचाशीते रधिकमपनीते तु वयसि।।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भवता। निरालंबोलंबोदरजननि कं यामि शरणं।।५।।
तात्या,
याचा अर्थ असा होतो:
हे गणेश जननी आई! माझे वय आता पंचाऐंशी वर्षाहून अधिक झाले आहे.आता माझ्या हातून काही होत नाही. कठीण पुजाविधिंना कंटाळुन मी सर्व देवांना सोडुन दिले आहे. अशावेळी हे आई! तुझी कृपा नसेल तर निराधार बनलेला असा मी कोणाला शरण जाउं ?
कठीण पुजाविधिंना कंटाळुन मी सर्व देवांना सोडुन दिले आहे.
याचा अर्थ असा कि मी त्या देवांच्या उपासनेचा मार्ग सोडून दिला आहे. शब्दशः देवांना नाही कारण जी वस्तू तुमच्या जवळ नाहीच ती तुम्ही कशी सोडुन देउ शकता??
"व त्यांच्या मदतीची आशा उरलेली नाही".
या आनंदघन यांनी दिलेल्या अर्थास मी सहमत नाही, वरिल श्लोकातील कोणत्या शब्दांचा असा अर्थ होतो?