वरील लेखात अंधश्रद्धा दिसून येते आहे. कृपया अंधश्रद्धा पसरविण्यास कारणीभूत होऊ नका, ही नम्र विनंती.
आचार्यांनी मोठ्या प्रेमाने त्याला उठवले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला, आणि अहो आश्चर्य , त्या तरुणाचा कुष्ठ रोग एकदम नाहीसा होऊन त्याला तेजस्वी कांति प्राप्त झाली.
आपल्या लेखावर आलेल्या खालील प्रतिसादातही अंधश्रद्धेलाच खतपाणी घातले आहे.
एकदा शंकराचार्य त्याला लोहाराच्या कामाच्या जागी घेऊन गेले आणि त्यांनी वितळलेला लोखंडाचा रस सरळ पिऊन टाकला.
मात्र, खालील दोन्ही प्रतिसाद, सौम्य भाषेत, माझ्याच मुद्याचे समर्थन करीत आहेत.
विरभि, शंकराचार्यांसारख्या कर्तृत्ववान माणसाला चमत्कारांची जंत्री देणाऱ्या बुवाबाबांच्या पंगतीला बसवू नये असे मनापासून वाटते.
मृदुलाताईंशी मी सहमत आहे. कुष्ठरोग असा मानवी स्पर्शाने जाणे शक्य नाही, हे तुम्हालाही पटलेच असेल.
हे प्रतिसाद देणाऱ्या दोन्ही मनोगतींचे मन:पूर्वक अभिनंदन.