मला वाटलं मुंबई-पुण्याकडे ह्या रोगाची साथ कमी आहे इकडे विदर्भात तर खूपच पसरलाय. कुणाला विचारावं की काय बरं नाही का तर उत्तर चिकन गुनिया! ज्या डॉची प्रॅक्टिस चालत नव्हती त्याच्यांकडेही भरपूर गर्दी. सगळ्या डॉनी वर्षभराची कमाई ह्या दोन महिन्यात केली असावी.असो. परवा एक मित्र भेटला.काय खूप दिवसात दिसला नाहीस, काय चिकन गुनिया का? नाही किचन गुनिया, बायकोला चिकन गुनिया झाला की पुरुषांना हा रोग होतो. काय हसू आलं ना! हसा आणि स्वस्थ रहा!