इतर लेखांप्रमाणे हाही लेख खास !
'मेन' म्हणजे आधीच्या बाईने काम का सोडले
त्याने धावून जाऊन लग्न केलं."
शर्टसुद्धा 'विन' केला नव्हता.
अरे व्वा! आमचे पैसे कुणालाही कसे देणार? आम्हालाच मिळाले पाहिजेत."
ही वाक्ये वाचून वाईट म्हणजे वाईट्ट हसले.
माझा अनुभव सांगायचा मोह होत आहे. आमच्या जुन्या कंपनीची मुख्य शाखा मुंबईत होती आणि मी पुण्यातल्या शाखेत नोकरी करत होते. कामानिमित्त मुंबईतून लोक यायचे तेव्हा आमच्या गप्पा ऐकून चाट पडायचे. कारण एकतर सगळेच मराठी आणि बरेचसे मराठी माध्यमातून शिकलेले. त्यामुळे म्हणी, वाक्प्रचार यांचा भरपूर वापर असे. मुंबईमधे आमची, एकदम 'हाय फंडू' मराठी बोलणारे अशी ख्याती होती. बऱ्याचदा आम्ही काय बोलायचो हे त्या धेडगुजरी मराठी भाषकांना समजायचेच नाही. आणि त्यांना समजावताना जाम मजा यायची.