विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया।  विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्याच्युतिरभूत।।
तदेतत्क्षंतव्यं जननि सकलोध्दारिणिशिवे। कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।२।।

हे माते,  मला पूजाविधी माहीत नाही,  माझ्याकडे संपत्ती नाही, मी स्वभावानेच आळशी आहे आणि तुझी व्यवस्थित प्रकारे पूजा करणे मला शक्य नाही. या सगळ्या कारणांमुळे तुझ्या चरणी सेवा करण्यात ज्या तृटी येतील त्याबद्दल मला क्षमा कर, कारण वाईट मुलगा जन्माला येणे शक्य आहे पण आई कधीच वाईट होऊ शकत नाही.

धन्यवाद, आनंदघन.