माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद ! खरेच भगतसिंगांविषयी फारशी माहिती नव्हती. इतिहासाची पुस्तके खरोखरच बदलायला हवी. निम्म्याहून जास्त पुस्तक गांधींविषयी असताना भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांची ओळख व्हायची कशी ?
कालच एका बातमीपत्र वाहिनी वर भगतसिंगांविषयी एक कार्यक्रम मी ओझरता पाहिला. तेव्हाच मनात आले की उद्या सर्वसाक्षी लेख लिहिणारच.
असो. त्या कार्यक्रमात, भगतसिंग अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून गणले जायचे. त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की भगतसिंगांनी इंग्लिश विषयात पारंगत व्हावे. पण शाळेमधे सर्व विषयात चांगले गूण मिळविणाऱ्या भगतसिंगांना इंग्लिशमधे मात्र काठावर पास होण्याइतके गूण मिळाले. त्याबद्दल वडिलांनी विचारणा केल्यावर, पास होण्यासाठी आवश्यक इतकेच गूण इंग्लिश मधे मिळविले आहेत आणि तेव्हढेच बास आहेत असे सडेतोड उत्तर दिले, असे काहीसे सांगितले होते.