विशारदाताई म्हणतात ते बरोबर आहे, पण अधिक सविस्तर उत्तरही मिळू शकेल.
संस्कृतात एक "ण"त्व विकृती म्हणून असते, तिचे नियम कोणी तज्ज्ञाने येथे दिले तर हा सर्व उलगडा होईल.
र, ऋ, इ. मुळे पुढील न चा ण होतो खरा, पण काही ठिकाणी तसा तो होत नाही. संस्कृत व्याकरणाच्या नियमांत हे सुस्पष्ट केलेले आहे पण मला तो नियम आत्ता नीटसा आठवत नाही म्हणून तज्ज्ञांना विनंती - मीराताई, शिक्षक, वगैरे संस्कृतज्ज्ञ मंडळी ... पहा बुवा आणि आम्हाला सांगा.
अशीच एक "ष"त्व विकृतीही (जीत स चा ष होतो) असते असे वाटते.
अर्थात मराठीत ते सगळे तसेच घेत असतील असा दावा नाही, काहीतरी भ्रंश होणारच.
दिगम्भा