आचार्यांनी मोठ्या प्रेमाने त्याला उठवले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला, आणि अहो आश्चर्य , त्या तरुणाचा कुष्ठ रोग एकदम नाहीसा होऊन त्याला तेजस्वी कांति प्राप्त झाली.
सर्व थोर लोकांच्या मागे नेहमी अशा कहाण्या का लागाव्या लागतात, कळत नाही. मला वाटतं त्याशिवाय सामान्य अंधश्रद्ध समाज मान देत नसावा. (किंबहुना भक्तगणांपैकीच कोणीतरी आपण ज्याचे भक्त आहोत त्याला समाजानेही मान द्यावा - ज्यायोगे त्या थोर व्यक्तीस समाजमान्यता प्राप्त होता आद्य भक्त म्हणून आपलाही भाव वधारेल - म्हणून अशा कहाण्या उठवून देत असावा, आणि कालांतराने इतरांचे पाहून स्वतःच त्या कहाण्यांवर विश्वास ठेवू लागत असावा, अशी माझी शंका आहे. ["If you tell a lie big enough and keep repeating it, people will eventually come to believe it." असं जोसेफ़ गोबेल्स (हिटलरचा प्रचारमंत्री) म्हणून गेल्याचं ऐकिवात आहे.]) विशेषतः या 'कुष्ठरोगनिर्मूलन' प्रकाराला तर मला वाटतं जागतिक अपील असावं. बायबलमध्ये येशूच्या नावावरदेखील 'कुष्ठरोगनिर्मूलना'च्या अगदी अश्शाच कथा आहेत.
एकदा शंकराचार्य त्याला लोहाराच्या कामाच्या जागी घेऊन गेले आणि त्यांनी वितळलेला लोखंडाचा रस सरळ पिऊन टाकला.
भिंत चालवणे, रेड्याकडून वेद वदवणे (ज्ञानेश्वर), नुसता हात लावून जखमा बऱ्या करणे, पाण्याच्या बुधल्याला हात लावताक्षणी पाण्याची दारू ("वाइन") बनणे* (येशू) या बहुधा याच पठडीतल्या गोष्टी असाव्यात.
- टग्या.
*हा चमत्कार मात्र आपल्याला घरी करून बघायला आवडेल. मानलं! चमत्कारच करायचे, तर असे काहीतरी उपयोगी चमत्कार करावेत!