अनामिक, छान लिहिले आहे. आत्ताच मी एच डी एफ़ सी चा पासवर्ड विसरलो आणि तुझा लेख वाचला. एकदम वास्तववादी, मजा आली.

पेठ्कर काका, " च्यवनप्राश" नाही ना ठेवू शकत परवलीचा शब्द. अनामिक ने लेखात लिहिल्या प्रमाणे परवलीचा शब्द अतिशय गुंतागुंतीचा असावा लागतो. उदाहरणार्थ: AMt.2433, एकेका कंपनीचे तसे नियम असतात आणि ते सुद्धा दोन ते तीन महिन्यात परवलीचा शब्द बदलावा लागतो.

अभिजीत पापळकर,  एखाद्याचा परवलीचा शब्द  शोधण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्या व्यक्तीला ओळखने जसे एखाद्याचा पासवर्ड त्याची जन्म तारीख किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाची, त्याची आवडती व्यक्तीचे नाव, इत्यादी असू शकते.त्या शिवाय संगणकाची Operating System  काय आहे ते पारखून काही प्रोग्राम वापरणे, किंवा स्वतः एखादा प्रोग्राम लिहिने. त्यामुळे मी जे उदाहरण दिले आहे तसा पासवर्ड बनवावा (तो सुद्धा तोडता येतो पण फार वेळाने). तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे पण मी देऊ शकतो कारण मी  Information Security Specialist म्हणून काम करतो त्या शिवाय मुंबई पोलिसांच्या cyber crime cell मध्ये volunter म्हणून जातो.